Wednesday 29 June 2016

.....निदान स्वप्नात तरी ये माझ्या .....

दिवस सरून गेला , तरी आस तुझी आहे
खर्या खुर्या जगामध्ये , भास तुझा आहे
बस साथ हवी तुझी, मग फिकीर न जगाची
जवळ येऊन माझ्या, आस पुरी कर मनाची
आस लावून बसलेत डोळे, उगा वाटेकडे तुझ्या
खर खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या..

गूढ त्या नजरेचं, जणू कोड होऊन गेलंय
लपलेलं ते उत्तर, पार तुझ्यात बुडून गेलंय
तू ये जवळ आज , निदान तेच देण्यासाठी
माझ्या डोळ्यांमध्ये तुला , साठवून घेण्यासाठी
झुरतय माझं मन , नुसत आठवणीतच  तुझ्या
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..

प्रेमाचे ते वारे , पार तुफान होऊन गेलंय
सरळमार्गी वाटेला, त्याने दिशाहीन केलंय
भरकटलेली मी, तुझी वाट शोधते आहे
देवाकडे रोज , आता तुलाच मागते आहे
मग झुरत ठेऊन मला, अशी पाहू नकोस मजा
खरं खुर जमत नाही निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..

भेटीसाठी तुझ्या, ते नभ वेडे झालेत
वाट बघता बघता , पार थोडे थोडे झालेत,
दुखावलेले नभ, माझ्या डोळ्यातून बारसतात
आस ठेऊन वेडी, तुझ्या येण्यासाठी तरसतात
ते नभ निर्दोष आहेत , मग त्यांना का देतोएस सजा
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या..

वेळ नसेल तर,  वेळ काढून ये
जगाचे ते भेद, सारे तोडून तू ये
कमी असेन मी, तर तू पूर्ण करण्यासाठी ये
नेहेमीच जिंकलास तू, आज हरण्यासाठी ये
रोखत असेल पाश, त्याला मोडून तू ये
आठवण असेल माझी, निदान ती घेण्यासाठी ये
झोप हरवलेल्याला ,झोप देण्यासाठी ये

तुला भेटण्याचा, आता नाही दुवा दुजा
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..


11 comments:

  1. Awesome.. really heart touching

    ReplyDelete
  2. Awesome.. really heart touching

    ReplyDelete
  3. अप्रतिम

    पण कुणासाठी? ??

    ReplyDelete
  4. अप्रतिम

    पण कुणासाठी? ??

    ReplyDelete
  5. Fantastic Khup chaan Ambadnya

    ReplyDelete
  6. Speechless... Awesome poem Rasika

    ReplyDelete
  7. खूप सुंदर कविता रसिका जी,सद्गुरु बापू ची माहितीही खूप छान.. अतिशय मनापासून आहे सर्व लिखाण👍👍

    ReplyDelete
  8. खूप सुंदर!!

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete