Tuesday 24 May 2016

वाचाल तर वाचाल

आपण सगळेच जगण्याच्या धडपडीत गुंतलेले जीव आहोत. रोजची धावपळ व निर्माण होणारे नवनवीन प्रश्न सोपे राहीलेले नाहीयेत. 

त्यात, स्त्रीयांना तर अगदी तारेवरची कसरतच् करावी लागते. मुंबईसारख्या शहरात, लोकलच्या वेळेवर जगणारी स्त्री- खरोखर एक यांत्रिक जीवन जगते आहे. घर, मुलंबाळं, नोकरी, समारंभ, नातलग, मित्र परिवार या सर्वांची सांगड घालणे जिकरीचे जरी झाले असले तरी, कौतुक वाटते त्या महिलांचे ज्या, लोकलमध्ये उभे रहायला थोडी जरी जागा मिळाली, की त्या वेळेत काहीतरी वाचन करतात. मग ते देवाचे स्तोत्र, वर्तमानपत्र असो वा आवडीचे पुस्तक. मिळालेला वेळ "वाचन" सारख्या आवडीच्या गोष्टीत घालवतात. 

कौतुक वाटते कारण, "स्त्रिया  वाचत नाहीत" असे एक सर्वसाधारण आणि लोकप्रिय मत आहे. अशा प्रकारची मते बर्याच वेळा वरवरची असतात, व्यवस्थीत निरिक्षण न करता केलेली असतात. तरीसुद्धा वाचन करण्यामध्ये, महिलांचा वेगळा गट केला तरी त्यात किती टक्के येतील ही शंकाच आहे!! 

का वाचत नाहीत स्त्रिया? याची कारणेसुद्धा एक नाही - अनेक आहेत..जसे दैनंदिनी सांभाळत स्वत: च्या आवडीसाठी तेही 'वाचनाची' आवड असेल तर-क्वचितच वेळ मिळतो. इतर ठिकाणी म्हणजे, कष्टकरी समाजातल्या नवरा-बायको किंवा कुटुंबात वाचनाची चैन परवडत नाही. शेतकाम किंवा मोलमजूरी, घरकाम किंवा स्वत: चा व्यवसायात स्त्रीया इतक्या बुडालेल्या असतात की, वाचण्याची शक्तीच त्यांच्यात उरतच नाही. 

शहरातही वेगळे चित्र नाहीए. घरकाम करणार्या असो वा नोकरी करणार्या - नवरा, घर, मुलं, सासू-सासरे ह्या सर्वांची खातिरदारी करता करता, स्वत:साठी वेळ व त्राण उरत नाही. 

आता पुढचा प्रश्न!! या सगळ्या चक्रातून सुटलेल्या आणि लिहू वाचू शकणार्या महिला तरी वाचतात का? हा खरा प्रश्न आहे. या शिवाय , वाचले तरी काय वाचतात हेही महत्वाचे!! पुस्तके २ प्रकारची असतात- माहिती देणारी आणि आनंद देणारी. एखादे चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद काही निराळाच असतो. 

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते. आज आपल्याकडे अनेक लेखिका आहेत , शिवाय वाचनासाठी भरपूर साठा आहे - अगदी लहान लेखांपासून ते कथा कादंबर्या, निसर्ग, पाककृती, व्यावसायिक, छंद, आत्मकथा इ. 
        
सुनिता देशपांडेंचे पु.लं वर लिखाण, किरण बेदींचे, "आय डेअर", सुधा मूर्ती - एक ना अनेक!! 
 आत्मचरित्र वाचताना - असेही जगणे असते!?! असेच वाटत रहाते , पण जगतांना वेगवेगळ्या प्रसंगात माणसे कशी वागतात, हिंम्मत धरतात, मोडून पडली तरी पुन्हा कशी उभी रहातात, आधार मिळवतात व कटू प्रसंग गिळायला कसे शिकतात .. ह्यावरून समजते. चरित्र-आत्मचरित्रे ही तर माणसे समजून घेण्याची मोठी वाटच् दाखवतात. माणसांचे चुकणे, नाती सांभाळणे, सहजरित्या क्शमा करणे, स्वार्था पलिकडचा विचार करणे - अशा गोष्टी शिकायला मिळतात. शौर्यकथा बळ देतात- जीवनात येणार्या नवनवीन आवाहनांना तोंड द्यायला. निसर्ग चित्रण - एखाद्या रम्य जागी घेऊन जातात! 

वर्णन कमी पडेल इतक्या पुस्तकांचे प्रकार आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर , जगाच्या पाठीवर - कायमचा सोबती ज्यात आपण रमून जाऊ शकतो म्हणजे - पुस्तक!! 
अनेकवेळा पुस्तक वाचताना आपली प्रश्नेसुद्धा सहज सुटतात. वाचनाने आपण काळाबरोबर रहातो. वेगवेगळ्या क्शेत्रातली पुस्तके ज्ञानवर्धक, आरोग्यासंबंधीची पुस्तके दैनंदिनी सांगतात, योगा-व्यायाम , धार्मिक -हजारो विषयांवर लाखो पुस्तके आहेत - तेही प्रत्येक भाषेत. वर्तमानपत्रातून देशोदेशींच्या रोजच्या घडामोडी वाचायला मिळतात. 
तेही सर्व आपल्या सवडीप्रमाणे, मात्र अट एकच् " वाचाल तर वाचाल".
ह्या विषयावर काही ओळी...खास करून माझ्या मैत्रिणींसाठी !!

कवितेचे शीर्षक - " वाचाल तर वाचाल"

वाचाल तर वाचाल 
नाहीतर फुशारक्या 
कशा माराल !!!!

     अहो, वाचाल तरच होईल
      बुद्धी मोठी,
      नाहीतर सतत घ्यावी लागेल
      कुणाची तरी काठी!!

वाचाल सतत तरच होईल
मन मोकळं,
नाहीतर लावावी लागतील
सतत त्याला ठिगळं!!

     वाचाल तरच सुटतील 
      प्रश्नांची उत्तरं,
      नाहीतर मिरवावी लागतील
      सतत ह्याच प्रश्नांची लक्तरं!!

आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी
आहेत की हो वाचनालय,
रोज रोज नवीन नवीन 
पुस्तक ज्यात आलंय!!

      करूयात संकल्प
       वाचूयात रोज एकतरी पान,
       चला ग सख्यांनो, राखूयात
        मिळालेल्या शिक्षणाचा मान !!!!

ओळख

काल परवा फेसबुकवर आमच्या एका मित्राने त्याच्या बालमैत्रिणीची ओऴख करून दिली. आणि अशा प्रकारे त्याने खूप वर्षांनी त्याला भेटलेल्या प्रत्येकाची नव्याने ओळख करून देऊ लागला.

तसं पहायला गेलं तर ह्या सर्वांना माझ्या लहानपणी शाळेत पाहीलं होतंच. पण तेव्हाची 'ती' ओळख वेगळी अन् आज परत अगदी मोजक्याच शब्दांत -पण खूपच सुंदर ओळख त्याने करून दिली, त्यामूळे नवीन व्यक्तीमत्वांची ओळख माझ्या स्मृतीपटलावर कोरली गेली!!

"ओळख" !! खरंच किती महत्वाचा आहे हा शब्द!!  अगदी आईच्या पोटातून बाहेर येण्याआधीच आपण झगडत असतो ह्या एकाच गोष्टीसाठी!! ह्या शब्दाचे अनेक अर्थ निघतात ..म्हणाल तर आणि काढाल तितके!! आणि मजेची गोष्ट म्हणजे , "म्हणाल तसे.....!!
आता हेच पहा ना.....

एखादा नेता मतदानाच्या वेळेस, त्याला भेटणार्या प्रत्येकाला येता जाता न विसरता आवर्जून सांगतो, " ओळख ठेवा हो...." म्हणजे काय, तर - " मला मत द्या" ; तर एखादा गुंड मवाली म्हणतो , " ओळखत नाहीस काय रे मला?? बघतोच कसा तू...."

जेव्हा २ जिवलग मित्र मैत्रिणी आयुष्याच्या वाटेवर वेगळे होत असतात , तेव्हा त्यांचे पाणावलेले डोळे एकमेकांना हेच आश्वासन देत असतात , " परत भेटलो की ओळख देशील ...विसरू नकोसsss..."

असेच परवा मी माझ्या खोलीत बसले असता, माझ्या पाठीमागून दोन नाजूक हातांनी माझ्या डोळ्यांवर हात ठेवला आणि वेगळ्याच आवाजात मला विचारले, " ओळख कोण?" . मी आपली त्या हातांना स्पर्श करून विचार करत होते , कोण असावे? कारण , असे करणारे म्हणजे आपल्याच जवळचीच व्यक्ती असते., जी अशीच जीवनाच्या वाटेवर अचानक भेटून सोडून गेली असते....तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यास!! अन् मागे राहतात त्या त्यांच्या आठवणी... त्यांच्या सोबत घालवलेले काही मोजके क्शण!! Golden Memories!! सुख-दु:खाचे मैत्रीचे नाजूक बंध!! किती हळूवारपणे ते आपले होऊन जातात, कि आपण त्या बंधनातून मुक्त होऊच शकत नाही! मी स्पर्शाने चाचपडत होते कि कोण असावे!?! मात्र त्या व्यक्तीचा धीर संपत आला आणि, " हे काय हो काकू ...इतक्यात ओळख विसरलात? जा बाई मी नाही बोलत तुमच्याशी..." अशी गोड लडीवाळ आवाजातील धमकी ऐकली नि एकदम तो हसरा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहीला!! " अरे ...ही तर माझी चेतना..माझी होस्टेलमधली रूममेट...!!"
झालं Madam रूसुन बसल्या, कारण इतक्या वर्षांचा सहवास असूनदेखील , मी तिला ओळखू शकले नाही. मात्र परत अशी चूक होणार नाही..." अशी खड्या आवाजात धमकी देऊन , मग मात्र मला अगदी लहान मुलासारखी बिलगली!! कळी फुलली अन् होस्टेल मधले ते ४ वर्ष आम्ही परत जगलो, तिने तिच्या सुखी संसाराच्या गोष्टी सांगितल्या...वेळ कसा गेला समजलेच नाही. आणि परत जातांना तिच्या डोळ्यांतील भाव तेच सांगत होते...नव्हे विचारत होते ...." काकू , परत भेटलो की ओळखणार न मला लगेच?"

ईवल्याशा डोळ्यांनी जग पहायला शिकल्यापासून प्रत्येकजण असेच अनेक ओळखी निर्माण करत असतो..अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ....नव्हे तर त्याहीनंतर अनेक वर्ष त्याची 'ओळख' रहातेच की!!!

आपली पहिली 'ओळख' असते - ते म्हणजे प्रत्येकाचे 'नाव name नाम' !! ही मात्र हरेक मानवाची गरजेची 'ओळख'! नवीन जीव जगात आला कि तयार होते त्याचे ओळखपत्र-जन्माचा दाखला - birth certificate जो अतिमहत्वाच्या कामांना लागतोच! जी जन्मापासून ते मरणोत्तर लागतेच- ही महत्वाची खूण / दस्तावेज कायम fresh ठेवावाच लागतो!! आता त्याची अनेक रूपं आहेत - जसे Identity card, ration card, debit -credit card, passbook, election card, Adhaar Card, Passport. Internet जगतात तुमच्या फोटोसह जन्मतारीख, स्थळ, शाळा -कॉलेज ई...ह्या सर्व गोष्टी तुमची 'ओळख' पटवतात कि - हे details मिळाले म्हणजे - तीच व्यक्ती आहे. हल्ली अनेक ठिकाणी character certificate हे त्याचे नवे रूप...म्हणजेच तुमच्या ' चारित्याची ओळख'!! 

शाळा/कॉलेजमध्ये असताना, आपली अनेक जणांशी ओळख असते, पण त्यातले मोजकेच चेहरे कायमचा ठसा आपल्या ह्यदयावर उमटवतात तर , काही नकोसे सुद्धा होतात. कारण आपलं त्या व्यक्तीशी पटत नसतं maybe any reason..पण जीवनाच्या वाटेवर चालताना , कधी जर ह्या दोघांपैकी - कुठे अडचणीत असतांना भेटला , तेव्हा मात्र सहज भावना व्यक्त होताना दिसतात, "बरं झालं तू भेटलास/भेटलीस आणि मला 'ओळखलंस...., नाहीतर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक!! Thanks yaar.." आणि तेव्हाचे तुटलेले / दुरावलेले नाते नवीन रूप घेते- कायमचे"
किंवा कधी ह्याउलट परिस्थितीसुद्धा होते..एखादी मैत्री कायमची तुटते...मग कितीही वेळा तुम्ही समोर आलात तरी "ओळख दाखवता येत नाही.." त्यामागे अनेक कारणं असू शकतात, किंवा एखाद्याला "ओळख ठेवणे नकोच..." असेही होऊन जाते. मात्र अशावेळी आपण कधीकधी फक्त स्वत:पुरतंच बघत असतो, कारण आपण हे स्वीकारूच शकत नाही कि काही वर्षांपूर्वीची ती 'ओळख' ( ती व्यक्ती) आता ( उदाहरण..तेव्हा ती व्यक्ती त्रासदायक वाटत असेल पण आता तिचा स्वभाव बदलला असेल /नसेल. ह्यातच आपले संबंध रखडतात -अडकून पडतात) आणि आपण ओळख देणे टाळतो.

सध्या माजी विद्यार्थ्यांचे गट तयार होत असतांना अनेक ठिकाणी दिसतात- Alumni- ह्यात तुमची महत्वाची 'ओळख' काय असते , तर तुमची शाळा/कॉलेज -शैक्शणीक क्शेत्र. मग असेच धागे दोरे मिळत जातात आणि अनेक वर्षांपूर्वी माळेतले वेगवेगळे झालेले मणी परत गुंफत जातात आणि पुन्हा एक सुंदर माळ तयार होते.. जुन्या कडू-गोड आठवणींची जागा फक्त मधुर सय होण्यासाठी एकमेकांत गुंफतात आणि अगदी सहजरित्या ह्या 'ओळखी' एकत्र येऊन समाजोपयोगी कार्ये हातात घेऊन कायमचे एकत्र येतात.

ह्यातसुद्धा मजा असते जेव्हा एखादा खट्याळ खोडकर मित्र आपली 'ओळख' .."ए तू तेव्हा किती चिडायची!!" किंवा " मला तुझं मराठीतले ज्ञान खूप आवडाचं" " किती खोड्या करायचास रे तू" " ए तो बघ , आपल्या वर्गातला दादागिरी करणारा..आता पहा कसा जेंटलमन झालाय" " अरे तू तर तेव्हा किती लेंभळट होतास..आता काय यार ..खूपच फरक पडलाय रे तुझ्यात" " अरे ती बघ...किती मोटी (जाड) होती- आता जशी चवळीची शेंग!!" " अरे यार बरं झालं इथे भेटलास, बाहेर कधी दिसला असतास तर ओळखलंच नसतं यार तुला!!" अनेक वाक्य कानावर पडतात. - मात्र ही सुद्धा एक प्रकारची "ओळख परेडच्" असते नाही का!! " अरे तो बघ जोशीसरांचा लाडका. काय रे किती वट होता तेव्हा त्याचा , त्यांच्या periods ला, मात्र कुलकर्णीसरांचा कायम मार खायचा!!" " अरे ती बघ ती चश्मीश! सतत अभ्यासात गर्क! त्यामूळे ती आज Chief Justice झालीए!! ओळख असावी तर अशी यार!!"

रोजच्या जीवनात तर आपण असेच अनेक ओळखीचे  प्रकार पहात असतो...ओळखीची ओळख करून घेत असतो. जसे .... एखादे गुपीत बहीण-भावात share केले जाते, मात्र ते कधीच कुणालाच सांगायचं नसतं. "त्याची 'ओळख'ही दाखवायची नसते." ऑफिसमध्ये बॉस म्हणतात ," तुम्ही म्हणजे माझी team माझी ओळख आहात. आपल्या teamwork वरून आपली ओळख तयार होते".

घरात आई-वडिलांचा वाढदिवस surprise म्हणून साजरा करायचा बेत ठरला कि, त्याची जराही ओळख दाखवायची नसते..कारण ते एक गुपीत असतं! त्यांच्या चेहर्यावरील आश्चर्यमिश्रीत प्रेमाचे भाव टिपण्याचे!! रोजचा घराबाहेरचा परिवार तर मोठाच असतो - ठरलेला असतो ..जसे- भाजीवाला, दुधवाला, डबेवाला, फुलवाला ई..एक ना अनेक!! आणि ह्या ओळखी मात्र आपण नसतानासुद्धा वर्षानुवर्षे जीवंतच् राहतात!! हे बंध कायमचे घट्ट होतात!! परत कधी कुठे भेट झालीच तर मग सुखद आठवणी परत जाग्या होतात! आपण स्वत: fresh होतो त्या 'ओळखी' ने!!

उदाहरणं भरपूर आहेत, पण आपण प्रत्येकाची सतत ओळख करून घेत असतो--जतन करतो--जगतो--आणि शेवटी आपलीच एक ओळख आपल्या मागे ठेऊन जातो ---- स्मृतीत!!
लहानपणापासून प्रत्येकाला त्याचे आई-वडिल ,आजीआजोबा, शेदारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी हेच सांगताना ऐकू येतात कि, "शेवटी काय..मेल्यानंतर आपली ओळखच् मागे रहाते.."!!

असेच आयुष्याच्या कुठल्यातरी क्शणी आपण अध्यात्मिक मार्गावर चालायला लागतो आणि तिथेसुद्धा प्रत्येकाची ओळख पटाण्याच्या अनेक पद्धती असतात. जसे- " हरि ऊँ, जयश्रीकृष्ण, जयश्रीराम, जयगुरूदेव,रामराम....."
तात्पर्य काय ?
तर,
जितके स्वभाव ..तितक्या ओळखी
जितकी जवळीक /द्वेश ..तितक्या आपल्या हव्याहव्या / नकोशा ओळखी!!!!!

जसजसे आपण वयाने /कर्तृत्वाने मोठे होतो, तसतशा ओळखी वाढतात..काही राहतात तर काही विरून जातात. काहींना तिलांजली द्यावी लागते, काही ईच्छेविरूद्ध बाळगाव्या लागतात , तर काही प्रेमाचे संबंध कडवट होतात...मात्र प्रत्येकाची सुप्त एकच् ईच्छा असते कि, " माझी नेहमी चांगल्याच प्रकारे ओळख व्हावी / करून देण्यात यावी" आणि अशावेळी introduction करून देताना चूकुन काही चूक झालीच तर मात्र ....ओळखी कायमच्या दुरावतात!!

"ओळख" ही मानवांपुरतीच मर्यादीत नाही तर , प्राणीमात्रांनासुद्धा 'ओळख' हीच महत्वाची देणगी / वरदान दिलंय परमेश्वराने! आणि हे प्राणीदेखील बरोब्बर 'त्या' ओळखीचा वापर करतातच्. काही प्राणी-पक्शी जसे- पोपट - मिठू मिठू बोलतात, घरातल्या व्यक्तीस बरोबर ओळखतात! त्याची पावती देतात "ओळखीचे आवाज काढून!" किंवा पाळीव प्राणी जसे- कुत्रा मांजर गाय म्हैस ई. , त्यांच्यातील "वास घेणे " ह्या 'नाकाद्वारे' आपल्या माणसाला ओळखतात आणि शेपूट हलवून/हंबरडा फोडून 'ओळख पटवतात!!

अगदी काही दिवसांचे बाळसुद्धा आपल्या आईचा स्पर्श लग्गेच ओळखतं!! तर hospitalमध्ये आपण पहातोच की अनेक पाळण्यांमधे बाळ ठेवलेले असते (अपवाद) ..अगदी १दिवसाचे बाळसुद्धा. आणि आई , त्यातून म्हणजे अगदी सारख्याच् दिसणार्या बाळांमधून स्वत:चे बाळ त्वरित ओळखतेच!! आणि जुळ्या-तिळ्यांमधील फरकसुद्धा आई-वडिलच् ओळखू शकतात!!  पाळीव प्राणी चोर ओळखतात, श्वानांची तर खास ह्यासाठी मदत घेतली जाते! Bomb Squad मध्ये ह्यांचेच राज्य असते -वट असतो!! पाऊलखूणा विशिष्ट वासावरून हे श्वानच् चोर ओळखतात!

नवरा -बायको तर कायम एकमेकांना हेच सांगत असतात, " अग/अहो, आज ओळखतो का तुला?"  मग ती प्रेमाची दटावणी असेल वा रागाचा सूर!!
कधी कधी आपणसद्धा स्वत:ला खूप उशीरा ओळखायला लागतो!! Especially जेव्हा आपल्यातल्या hidden skills जसजशा फुलत जातात, explore होतात तशी आपण स्वत: ची ओळख करून घेत असतो आणि मग स्वत:लाच म्हणतो, " बापरे! मी हे करू शकते!!!!माहीतच् नव्हतं मला! स्वत:चीच नवीन ओळख - स्वत:लाच करून देत असतो!

जाता जाता अजून एक ओळखीचा प्रकार.. चोर पकडण्यासाठी पोलिस स्टेशन / कोर्टामध्ये ओळख परेड, तर, लग्नकार्यात वधू वराकडील नातलगांची especially पुरूषांची 'ती' ओळख मजेशीर असते, ज्यात एकमेकांना हातात श्रीफळ देताच आणि आळीपाळीने वर-वधूचे काका, मामा, भाऊ ह्यांची "टोप्या" घालून "गळाभेट" होते!!

आणि ईकडे सासूबाईंची लगबग असते , आपल्या सुनेची सर्व नातलगांना 'ओळख' करून  देण्याची! त्यातच् हे नवीन जोडपं (नवरा नवरी) एकमेकांना नजरेतून ओळख पटवण्याचा गोड प्रयत्न करत असतात!! कारण ही आता कायमची 'ओळख' होणार असते- " सौ व श्री / श्री व सौ/ श्रीमती / Mr & Mrs.."

तर अशी ही "ओळख" !!

मलासुद्धा आज स्वत:ची नवीन ओळख झाली! सहज विचार आला कि आपण काहीतरी लिहावं आणि सहज स्वत:ला एक प्रश्न विचारला ," तू कोण? तुझी ओळख काय?"  आणि हा लेख तयार झाला!!!!!!

खरंच किती सुंदर भावना आहे ही ... स्वत:चीच पुनर्ओळख ...पुन:ओळख!!!