Wednesday 15 March 2017

..... खचणार नाही - कारण ....

आयुष्याच्या वाटेवर चालताना आपण विविध लोकांच्या संपर्कात येतो . मागच्या महिन्यात अशीच एक जूनी मैत्रीण मला भेटली असता आमच्यात गप्पा रंगल्या आणि साहजिकच आमचा विषय सद्गुरुंवर येऊन थांबला. ती ज़रा बिचकुन घाबरतच बोलत होती ह्या विषयावर. नुकतेच माझ्या पतींचे - राहुलसिंह संत यांच्या tongue cancer बद्दल बोललो आणि हे ऐकून ती चाटच पडली कारण मी तिच्या प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तर देत होते . आणि तिने मला एक प्रश्न विचारला की, "तुझ्या अडचणीतसुद्धा खचत कशी नाहीस ?".    तिला मी त्यावेळी उत्तर  तर दिलच पण नंतर मात्र आजपर्यंतचे सर्व जीवन एक फ्लैशबैकसारख समोर दिसल आणि माझा , माझ्या सद्गुरुंवर माझ्या अडचणींमध्येसुद्धा इतका विश्वास का आहे हा विचार करत असतांना , त्यातूनच काही ओळी सुचल्या त्या अश्या ......

हे सदगुरूराया हे नंदारमणा ....


हे सदगुरूराया हे नंदारमणा 
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
     मजसाठी जे जे उचित 
     देतोसच तू निश्चित ,
    खचणार नाही - कारण....
    मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .  
     केलेले प्रयत्न होतात व्यर्थ 
     आत्मबल शिकवून 
     मनासी करतोस समर्थ 
     खचणार नाही - कारण....
     मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
    प्रयासास माझ्या देऊनि बळ 
     विजयाची वाट दावतोस निश्चळ 
     सत्यप्रेमानंदाचा तू महासागर 
     तव प्रेम कृपा अपरंपार 
     ग्वाही तुझी पदोपदी आळवत ,
"तू आणि मी मिळून पाहि , अशक्य ऐसे काहीही नाही "
खचणार नाही - कारण...
     मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
हे सदगुरूराया हे नंदारमणा 
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता . 

मी अम्बद्न्य आहे