Tuesday 5 July 2016

मला कळलेले मन ....

मनः सृष्टी ( The Centre For Psychological Development & Studies), पुणे तर्फे  "मला कळलेले मन ...!" ह्या विषयावर  निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मनःसृष्टी ही संस्था मानसिक स्वास्थ्य संदर्भात समाजात जागृती निर्माण करण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य करते.  मन म्हणजे नेमके काय हे जर समजून घेता आले तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल , असा विचार करून मनःसृष्टी संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. मानवी मन ह्या संकल्पनेवर विचार व्हावा ,वाचन व्हावे , मना संदर्भात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न व्हावा आणि मनःस्वस्थ्याच्या दिशेने एक पाउल पुढे पडावे हे सदर स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. स्पर्धेचे नियम :- 
१) शब्द मर्यादा ५०० ते १००० शब्द
२) निबंध स्वलिखित, अप्रकाशित आणि मराठी भाषेत लिहिलेला असावा.
३) ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मनाचा अभ्यास असावा ही अपेक्षा असल्याने निबंधात  कुठल्याही पुस्तकातील मजकूर कॉपी करणे अपेक्षित नाही. निबंध स्वतःचे विचार अनुभव व अभ्यास ह्यावर आधारित असावा.
४) मानःशास्त्र विषयात काम करणारे व्यावसायिक व विद्यार्थी सोडून इतर सर्वांना स्पर्धेत भाग घेता येईल.

अशा स्पर्धेत भाग घेण्याची माझी पहिलीच वेळ !! तरीही माझ्या मैत्रिणीने माझ्यावर विश्वास दाखवून मला लिहिण्यास प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी,  श्रीमती संगीता जाधव गिरमे चे मनापासून आभार मानते. आणि माझ्या सद्गुरू डॉ अनिरुद्ध (बापू) धैर्यधर जोशीकडून आजपर्यंत जे शिकले तेच लिहायचा प्रयास केला आहे. 

                                                        ...... मला कळलेले मन .....

"प्रेम आणि युद्धात सर्वच माफ असत.." असे आपण नेहेमीच म्हणतो. खरतर दोन्ही २ टोकाच्या गोष्टी !! प्रेम - नवजीवन देत, तर युद्ध जीवनाचा अंत करत. !! मग असे काय साम्य आहे दोघांत कि दोहोंमध्ये सगळच माफ असत? ...... कारण दोहोंमध्ये गुंतलय "मन " .

हेच मन - प्रेम / माया करत, हसत - रुसत - खेळवत, सुसाट धावत , चिडत , घायाळ होत , बंड पुकारून युद्ध करत, हळवे असल्याने माफही 'मन'च करत . आता तस पहिला गेलं तर आपल्या शरीरात "मनाची' विशिष्ट जागाच नाहीये, पण अस्तित्व १०८% आहेच - प्रत्येक प्राणीमात्रात !!

प्रेम आणि युद्ध बालवयापासूनच सुरु होते , म्हणजे जन्मापासून ते वय वर्ष १२ पर्यंतचा काळ हा 'घडवण्याचा ' काळ असतो ! जसा - कुंभार कच्च्या मातीपासून पक्का घडा बनवितो , त्याचप्रमाणे भोवताली घडणाऱ्या प्रत्येक हालचालींचे पडसाद बालमनावर पडून हळूहळू त्या मनातल्या कोपर्यात नकळत कोरल्या जातात नी त्यांचे परिणाम वय १२ नंतर दिसायला लागतात. मुलांचे मन निरागस असते, ज्यात कुठलाच भेदभाव नसतो . येणारा प्रत्येक क्षण नवाच असतो आणि त्यात , ही निरागस मने डुंबून जातात. ह्यांना प्रत्येक गोष्टीची तीव्र उत्सुकता असते. जसे वय वाढत जाते , तसे भोवतालच्या वातावरणाचा बालमनावर पगडा बसत जातो आणि त्याचा परिणाम पुढच्या हालचालींवर दिसू लागतो. अश्यावेळी घरातल्या मोठ्यांनी चुकीच्या गोष्टींना कौतुकाची झालर लावल्याने त्याचे नकळत दुष्परिणाम होऊन , 'मुले हाताबाहेर गेलीत' ...समजल्यावर मात्र , पालकांच्या पायाखालची जमीन सरकते !!

सेच सतत नकारात्मक वागणूक मिळाली कि आपलीच मुले आपल्यापासून मनाने दुरावतात - ती कायमचीच !! ह्यासाठी आवश्यकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे - मुख्यतः मुलांची मने दुखावणार नाहीत ही काळजी घेतलीच पाहिजे . शिवाय ह्याच वयात वाटून घेणे ( sharing) ची सवय लावणे अत्त्यावश्यक , नाहीतर पुढे 'माझेपणा' टोकास जाऊन मुलांचे कायमस्वरूपी नुकसान होते. अति मवाळ, अति शिस्त घातक ! मुख्यतया , वेळच्या वेळी गोष्टी करण्याचे महत्व / कारण त्यांना पटवून दिले की त्यांनासुद्धा परिस्थितीनुसार वागायला मदतच होते. अश्यावेळी पालकांनी , माया थोडी बाजूला सारून स्वमनाला कणखर बनवले पाहिजे. तरच परिस्थिती हाताळणे सोपे जाऊन आपणच आपल्या बालकांचे हितचिंतक बनून, येणारा काळ सुखद जाण्यास त्यांना मदत करू शकतो.

पण एखाद्याचे मन बदलायला जातो - जे अशक्य आहे. कारण आपण स्वतहाच स्वतःचे मन बदलू शकत नाही तर , दुसर्यांबद्दल असा विचारदेखील चुकीचेच आहे ! मन - बदलणे नाही,  तर - जाणून घेणे व त्याप्रमाणे वागणे गरजेचे . शिवाय ह्याच वयात मनावर नियंत्रण ठेवायला शिकवणे महत्वाचे . विशिष्ट गोष्ट मिळाली नाही की बालमन हट्टी होते व हळूहळू त्याचे रुपांतर बंड आणि शेवटी युद्धात बदलते. अश्यावेळी स्वतःचे म्हणणे खरे करून घेण्यास काहीही करायला तयार होते व चुकून इतर कुणाकडून ह्या चुकीच्या गोष्टींसाठी मदत झाली तर , हे मूल भविष्यात चुकीच्या विचारांनी वाम मार्गाला लागू शकते.

न अत्तिशय कोमल , चंचल , निरागस असत. हे सतत हृदय व बुद्धी ला खेळवत रहात - त्यांच्यातलच बनून रहात. हृदय धडकत पण मन बोलतं. बुद्धी चालते पण मन धावत. मनाला सतत सावरायला लागत कारण , त्याच्यासारखे कलंदर व्हायला बुद्धी व हृदयाला खुप मेहेनत घ्यावी लागते . मन एकाच जागी स्थिर नसत, तर अक्षरशः एकाच वेळी १० ठिकाणी सुसाट पळत. अश्या ह्या बेफाम मनाला स्थिर करण्यासाठी त्याला ' रमवण्याची ' गरज असते, आणि हे जर बालवयातच घडले तर सक्षम सबल मन तयार होत. त्यासाठी मुलांना वाचण्याची आवड निर्माण करून योग्य पुस्तके वाचनाची मार्गदर्शन केल्यास , मन व बुद्धी एकत्र येऊन भरीव काम करतात, ज्यामुळे इतर क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष जात नाही. शूरवीरांच्या कथा सांगितल्याने मुलांची विचारशक्ती वाढते व ते धाडसी बनतात. बौद्धिक व मैदानी खेळ मानसिक, शारीरिक व आकलन शक्ती वाढविते . तसेच देवावर विश्वासही तितकाच महत्वाचा. मुलांच्या उत्सुकतेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने , मनातले द्वंद्व कमी होऊन स्थिरता प्राप्त होण्यास मदत करते. मनःसामार्थ्य मिळते आणि येऊ घातलेल्या प्रत्येक क्षणाला हीच मन- बुद्धीची मैत्री जीवनाला सुंदर वळण देते. आणि ह्याच संगमामुळे , "माझे मन मला कळायला लागते."

ते धावत - पण सुसाट नाही तर आवश्यकतेनुसार आणि बेलगाम न राहता बुद्धीच्या छायेत राहून जीवन , साधे सरळ सोप्पे बनवते ! वाढत्या वयानुसार जीवनाची उद्दिष्ट्ये वाढत जातात - ह्यात अनेक वादळ समोर उभी राहतात , पण मन खंबीर झाल्याने ही वादळे मनावर कुठलाच नकारात्मक परिणाम न करता पुढील आयुष्यात उपयोगी पडणारे धडे शिकायला लागून , मनःपटलावर कोरायला लागत. मनाची व्यापकता - लांबी - रुंदी काहीच मोजता येत नाही म्हणूनच ते सतत वाहावत जात . मन खोडकर मिळाऊ मोहक विशाल असत , म्हणूनच मनाचे खेळ होतात , मनात मांडे रचतात , मन रुसत नाराज होत, पाखराप्रमाणे विहार करते.. ही सर्व मनाची रंग आहेत.

नाला बांध घालणे तसे कठीणच. मन कळायला स्वतःला तेवढा वेळ द्यावा लागतो - मग ते स्वतःचे असो व दुसर्याचे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात तर, मनासाठी वेळ काढावाच लागेल - थोड थांबाव च लागेल!
किशोर वयातले मन स्वतःच्या आवडीच्या ठिकाणी रमले कि हळूहळू त्याच्या छुप्या कला उलगडत जातात नि एक सुंदर विश्व तयार होते - आणि अगदी अलगदपणे , आधी जे अशक्य वाटत होत ते हळूहळू शक्य होत जात - सकारात्मक आकार घेत नव्याने त्याच्या विविध छटा दिसायला लागतात.

किशोर वय फार धोक्याचे म्हणतात. प्रत्येक ठिकाणी मन आधारासाठी धावत असत. म्हणूनच योग्यरित्या आवर घालता आला कि , मनावर होणार्या जख्मांपासून ते सुरक्षित राहते.


णि एक मात्र तितकच खरय कि , ज्याचा देवावर / श्रद्धास्थानावर विश्वास असतो , तेव्हा माझ्या (त्याच्या) मनाला खंबीर आधार मिळतो , ज्यामुळे माझ्या मनबुद्धीला जास्तीत जास्त सामर्थ्य मिळून मनावर लगाम लावता येतो. जेवढा दृढ विश्वास - तितकीच ताकत मिळते - मन बलवान करण्यासाठी .
हे बलवान मन कुठल्याही भ्रामक कल्पनेत न रमता वास्तवाशी हातमिळवणी करून , बुद्धीच्या सहाय्याने व श्रद्धास्थानाकडून मिळालेल्या उचित मार्गदर्शनाने , स्वावलंबी होऊन माझे वर्तमान व भविष्य सुसहय्य तर बनवतातच , त्याचबरोबर आखलेली उद्दिष्ट्ये यशस्वीरीत्या पार पाडून पुढील काळ सत्य, प्रेम व आनंदाने घालवण्यासाठी तयार होते.

र्मस्वातंत्र्याचा  उचित वापर करून एखादी गोष्ट करण्यामागे कारण, त्याची गरज व परिणाम जाणून असेल तर पुढील होणारा अनर्थ टळतो.
आणि मनाने माफ करायलाही शिकलाच पाहिजे . झाले गेले विसरून जाऊन योग्य धडे घेऊन कुठलाही गैरसमज न करता पुढे मार्गक्रमण करत राहायचे आणि "बंड" "द्वंद्वात" न अडकता जीवन सुखद बनते.

किशोर वय ते ६० वर्षांपर्यंतचा काळ संसारिक असतो आणि ह्यातच आपल्या मनाचा कस लागतो. मनावर ताबा ठेऊनच सुखाचा संसार होतो आणि ह्यामुळेच म्हातारपण आनंदात जाते.

त्यामुळे , अगदी बालवयातच मनाला उचित दिशा दाखवण्यास - मनाचा पक्का घडा बनवण्यास - संस्कारांचा लेप योग्यरीत्या चढवून , भोवतालच्या परिस्थितीचे पाणी वापरून  - मनाच्या चाकावर नियंत्रण ठेवण्यासाठी काठीचा उचित वापर करून मनाचा समतोल सांभाळत, त्रासदायक होणारी ज्यादाची माती - म्हणजे मनाचा समतोल ढाळणार्या गोष्टी काढून , उन्हात वाळवून म्हणजे - येणाऱ्या परिस्थितीस सामोरे जावून , श्रद्धा सबुरीचे रंग चढवून , तयार होणारा मानवी जीवनाचा पक्का घडा - येऊ घातलेल्या कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवतो आणि इतरांची तृषा भागवण्यास सदुपयोगी पडतो.

ह्या पक्क्या घड्यास , परमेश्वररूपी तोटी लावल्यास मनातला मळ- ( ज्यादाचे पाणी ) वेळोवेळी काढून टाकण्यास सहाय्यच मिळून आयुष्य सुखी होते. !!!!



  
    

3 comments:

  1. Ambadnya...
    Very nice article
    Jai Jagdamb, Jai Durge

    ReplyDelete
  2. खुपच छान 👌🏼👌🏼

    ReplyDelete
  3. खूपच सुंदरपणे मनाचा वेध घेतला आहे ।
    श्री राम अंबज्ञ ।।

    ReplyDelete