Monday 13 June 2016

" माऊली"

'आई' म्हणताच आठवे
प्रेमाची सावली
सर्वात श्रेष्ठ अशी
एकच ती माऊली....
     आईचा मार जणू
     गुलाबाचे काटे
     म्हणून हवाहवासा
     तो वाटे .....
मायेचा हात
फिरविता पाठीवरून
मन माझे येई
गहिवरून .....
     आठवता मायेची
     प्रेमळ मूर्ती
     मनात येते
     प्रेमाची भरती.....
त्याग अन प्रेम
पूजा तिची
अशीच असते
माऊली प्रत्येकाची .....
     लाभे ज्याला
     माऊलीचा सहवास
     नसे त्याला
     स्वर्गाची आस .....
फिटे ऋण
सर्व जगाचे .....
     पण फिटे ना ऋण
     या माऊलीचे ......

3 comments: