ll आरती सद्गुरूची ll
विश्वात्मक सद्गुरू संत हा जाणा l
कलियुगी नारायण विज्ञानी राणा l
नेती नेती शब्दे न ये अनुमाना l
पराभक्ती विण न ये तो ध्याना ll१ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll
सबाह्य अंतरी निर्गुण हे तत्व l
अज्ञानी जनांसी न कळे ही मात l
आदी अनादी एकची तू ब्रम्ह l
व्यापक तू सर्वत्र नसे तुज अंत ll२ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll
सतगुरु येउनी हो उभा ठाकला l
साष्टांगे प्रणिपात हा "भाऊ " ने केला l
शर्करा अधिष्ठान ठेउनी त्याला l
दिव्य चक्षु चा उपदेश हा केला ll३ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll
विश्वरूपाचे हो लागले ध्यान l
दिव्यचक्षुद्वारे बुद्धी उन्मन l
द्वैत भावाची झाली बोळवण l
सत्यवस्तू आहे ही सतगुरु जाण ll४ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll
दि.या. मार्डीकर
नागपूर
ता : ३ - ८ - १९६८
(क्रमशः )
No comments:
Post a Comment