Wednesday 3 August 2016

.........श्रीमती सुनीला यशवंत संत ........ भाग २


"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

भाग २ .....

      तसेच करमरकरांच्या आधी त्यांच्याच flatमध्ये एक जोडपे रहात होते. एकदा ते मालक ऑफिसला गेले असता त्या बाईंना काहीतरी जोरात कापले (पोटाच्या खाली ) व त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. राहुलने त्यांना विचारल्यावर , "तुमच्या आईंना लग्गेच पाठवता का ?" असे विचारले . आई तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि त्या बाईंना लग्गेच दवाखान्यात न्यावे लागेल. कारण continuously रक्तस्त्राव होत होता. आईंनी ताबडतोब त्यांना उचलले आणि रिक्षेतून दवाखान्यात घेऊन गेल्या. ती जखम इतकी सेरियस होती कि डॉक्टरांनी ताबडतोब एक छोटेशी शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला. तेवढया वेळात त्यांच्या Mrना फोने करून बोलावून घेतले. ते आल्या आल्या आईवरच खूप चिडले. "शस्त्रक्रिया करण्या अगोदर मला का नाही बोलावले?" वगैरे .... आईंनी त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेतले व त्यांना खरी खोटी सुनावून त्या म्हणाल्या, " आम्ही दवाखान्यात आलो तेव्हा परिस्थिती बघूनच Drनी ताबडतोब शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत. ते डॉक्टर आहेत कि तुम्ही ?" नंतर काही वेळाने त्या माणसाचा राग शांत झाला व त्यांनी आईची माफी मागितली.
      अतुल - राहुल लहान असतांना "रमेश " नावाचा १४-१५ वय वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर राहायचा. घरातली छोटी मोठी कामे करत असे. पण आई बाबांनी त्याला कधी परके समजलेच नाही. आपलाच तिसरा मुलगा म्हणून त्यालाही चांगल्या मार्गाला लावले. लग्नाचे वय झाले असता - चांगल्या घरातली मुलगी बघून त्याचे लग्न ह्यांनीच लावले व संसारही मांडून दिला. आजही रमेशदादा आईंना न चुकता भेटायला येतात. आम्ही तर त्यांना मोठ्या भावासारखाच मान देतो.
      अतुल - राहुल १२वी - १०वीत असतानाची गोष्ट. आई काही कामानिमित्त काही ओळखीच्यासह (नरेंद्र देशपांडे व इतर ) मुंबईला गेल्या होत्या. काम झाल्यावर बस स्थानकावर येताना एक गाडी चुकीच्या बाजूने overtake करत आली आणि जोरात आमच्या आईंनाच धडक दिली. ती धडक इतकी जबरदस्त होती कि त्या गाडीने आईंना १५-२० फूट फरफटत नेले . आई अगदी निपचित पडलेल्या. गर्दी झाली आणि सार्वजन ओरडायला लागले , " मर गई !! मर गई !!" दवाखान्यात घेऊन गेले असता दोन्ही पायाच्या गुडघ्यांना जबर मार लागला होता असे कळले. तात्पुरती treatment घेऊन त्या, इतरांबरोबर घरी आल्या. तोपर्यंत घरी काहीच कळवले नव्हते. घरापाशी रिक्षा थांबली. ' आईच्या बोलण्याचा आवाज येतोय पण येवढा वेळ झाला तरी घरात कशी आली नाही',  म्हणून बघायाला हे तीघे बाहेर गेले. जाऊन पाहतात तो काय ! ह्या अगदी हळू हळू बाजूला धरत धरत सावकाशपणे लंगडत चालत होत्या. चेहेर्यावर - हसू व यातना - दोन्हींचा संमिश्र भाव !! बाबांना कळेना काय झालय . सावकाश घरात येऊन बसल्यावर मग आईंनी हळूहळू घडलेली सर्व हकीकत सांगितली. बाबा, अतुल, राहुल अवाक !! येवढा त्रास होऊन देखील आईंनी घरी काहीच कळवले नाही आणि आत्तासुद्धा अगदी सावकाशीने सर्व सांगत होत्या . ते का ? तर बाबा heart patient होते व अतुल - राहुलची १२वी - १०वीची परीक्षा सुरु होती - त्यांना धक्का नको म्हणून हे सर्व कळवले नाही. आजही त्यांना गुडघ्यांचा खूपच त्रास होतो. एका गुडघ्याचं   knee replacement केलंय. पण तरीही कायम हसरयाच असतात. दुखतंय / त्रास होतोय म्हणून एकच ठिकाणी बसल्या आहेत किंवा कुरकुर करत आहेत असे काहीच नाही,  
      येणारा दिवस हसत खेळत घालवणे हे जणू त्यांनी ठरवलेच !! आपण दुखी व्हायचे नाही आणि आपल्यामुळे इतरांना दुखी होऊ द्यायचे नाही हेच त्यांचे जणू तत्व !! असेच दिवस जात होते, येणारे सण -वार मनापासून कारायचे . आमच्याकडे गणपती महालक्ष्मी  व नवरात्र साजरा करतात. घरात एकटी बाई - येणारी मंडळी , पाहुणे , सणवारांचे सवाष्ण -ब्राह्मण , गुरुजी - सर्वांचे कौतुक अगदी मनापासून केले. घरात मदत करणारे हात म्हणजे - बाबा , अतुल - राहुल.    
      अशातच ऑक्टोबर १९८९ चा महिना . देवाच्या मनात काय होते / काय असते कोण जाणे .. नवरात्रीचा उत्सव घरात मांडलेला ( तेव्हा माझी व राहुलची ओळख झाली होती त्यामुळे घरी येणेजाणे रोजचेच . आमचा प्रेमविवाह ) नवरात्रीतही मी घरी यायचे . लग्नाची परवानगी मिळालेली होती , पण आम्ही दोघेही शिकत होतो म्हणून ३ वर्षे तरी थांबायचे - राहुलला नौकरी मिळाली कि मग लग्न करायचे असे सर्वानुमते ठरले होते. नवरात्रात आमचे पराशरे गुरुजी घरी येऊन देवीचा पाठ करत.
      दुसर्या दिवशी दसरा. मी, घरी आदल्याच दिवशी खूप वेळ थांबले होते . तर बाबा म्हणाले , " आज तू लौकर घरी जा. पुढचा दसरा तुला इकडेच करावयाचा आहे. आज तू mummy-पप्पाबरोबर रहा, " मी खरतर निराश होऊनच घरी निघाले. काय माहित - पण त्यादिवशी मी जरा अस्वस्थच होते. आणि माझे व राहुलचे भांडण झालेच आणि मी घरी आले. इकडे, " उद्या दसरा आहे अनु ला श्रीखंड बटाटा भाजी फार आवडत म्हणून , तिला आल्यावर नक्की दे . कोणीही त्याला हात लावायचा नाही " अशी सग्गळ्यांना ताकीद !! ( मला, श्रीखंड व बटाटा भाजी अतिशय आवडत , म्हणून खास जास्त मागवून ठेवली होती )
      सग्गळे मित्रपरिवार येऊन भेटून गेले व सर्वांनी हसत खेळत दिवस घालवला . रात्री आई घर आवारात होत्या तर, " आत्ता आवरू नकोस, उद्या आवरावच लागेल . दमू नकोस" अस बाबांनी आईंना सांगितले. आणि रात्री severe heart attack आला......!! क्षणभर फक्त .....! आणि आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले....कुणालाही न कळवता ...न सांगता ....
      सकाळी ८ वाजता , माझ्या घरी राहुल चे २ मित्र आले , माझ्या mummyला सर्व सांगितले व " तुम्ही पप्पांना घेऊन लगेच निघा , आम्ही अनु ला घेऊन जातो ..."   त्यादिवशी मी जरा उशीरच उठले होते , तर mummy ने मला , "योगेश बरोबर तुला घरी बोलावलंय ...." एवढेच सांगितले. वाटेत दोघेही मित्र गप्पं!! मग कधीतरी मला सांगितले ," अनु, बाबा गेले. तू स्वतःला सावर....." जबरदस्त धक्का होता तो. काहीच बोलता आले नाही..घरी पोहोचलो आणि .....पळत दारापाशी गेले ...तर...बाबा निपचित झोपलेले....हालचाल नाही.... आजूबाजूला सर्व पुरुष बसलेले ...अस्पष्ट ..राहुल - अतुल दिसले...मला जरा चक्कर आल्यासारखे वाटले आणि काही कळायच्या आतच राहुल ने पुढे येऊन सावरले. आईजवळ घेऊन गेला. मला तर काहीच सुचेना काय बोलावे. आईंनीच मला जवळ घेतले आणि , मी त्यांना धीर देण्याऐवजी त्यांनीच मला सावरले धीर दिला आणि मला जवळ घेऊन कुरुवाळत म्हणाल्या ..." अनु, त्यांना तुझे कौतुक करायचे होते. धुमधडाक्यात तुमचे लग्न करायचे होते. पण तुम्हा पोरांच्या नशिबी त्यांचे सुख नाही ...तुझे बाबा गेले....." असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट दिली...."तुझ्या हातचा चहा त्यांना फार आवडायचा . "चाय हो तो ऐसी " असे आवर्जून म्हणायचे " .
      हा नियतीचा खेळ आईंनी निमुटपणे सहन केला आणि वर्षाच्या आत आमचे लग्न झाले . आई फार उदास राहायच्या . त्यांच्या हसत्या खेळत्या परिवाराला जणू खीळच  लागली होती, त्यांचे उदास राहणे बघून व रिती रिवाज म्हणून आमचे लग्न लौकर झाले. २७ february १९९० ला साखरपुडा व ३ मे १९९० ला लग्न ! लग्नातही सर्व सोपस्कार त्यांनी व्यवस्थित पार पाडले. माझे मोठे दीर दीपकदादा - आरतीवाहिनीनी आमचे लग्न लावले. पण त्या अजूनही म्हणतात , " अनु तुझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी मी काहीच करू शकले नाही. सणवार आणि कौतुकही करू शकले नाही. " ह्याची आईंना आजही खंत वाटते.
      एक वर्ष झाले आणि १६ नोव्हेंबर १९९१ ला - माझ्या मुलीचा - सुरश्रीचा जन्म झाला. माझ्या बाळंतपणाच्या वेळेस मला फार tension होते. आमच्याकडे आधी ४ मुली .- म्हणजे दीपकदादाच्या २ आणि प्रदिप्दादाची १. आणि आता मुलगाच होईल म्हणून सर्व नातेवाईकांची माझ्याकडून अपेक्षा होती.
      पण आमच्या आईंनी कधीही अशी अपेक्षा ठेवली नाही, त्या कायम म्हणायच्या, " अनु, तू काळजी करू नकोस. मला मुलगा - मुलगी काहीही चालेल. मुलगी झाली तरी माझ्या घरची लक्ष्मीच आहे ती. !! त्यामुळे तू काळजी करू नकोस. " त्यांच्या ह्या बोलण्याने मला खूप धीर यायचा. आणि सुरश्री आली. !! त्यांना खूsssप आनंद झाला. त्यांनी तिचे खूप कौतुक केले. तिची झबली टोपडी त्यांनी स्वतः शिवले. स्वेटर तर न जाणो किती तरी स्वतः विणले. "माझी सुरश्री --माझी ताई" खूप दिवस तर त्यांचे तेवढेच जग होते. त्या आणि सुमा (सुरश्री चे दुसरे नाव सुमीरा ) !! तिचे सर्वकाही त्याच करायच्या. तिच्याशी गप्पा कर..गाणी म्हण , गोष्टी सांग, तिच्याशी खेळ ...नवनवीन गोष्टी शिकव ...एक ना अनेक.  
      सुरश्रीच्या वेळेसच अतुलदादाचे लग्न झाले. नीता आली. मग सुरश्री व नीता ची पहिली संक्रात एकत्र! दोघींचेही हलव्याचे दागिने -- अगदी हलवा बनवण्यापासून आईंनी सर्व घरीच केले - मला शिकवले. लग्नाच्या आधीपासूनच अतुल नौकरीनिमित्त मुंबईत रहात होते.लग्नानंतर दोघे (अतुल-नीता ) मुंबईस परतले. तिथे आईंनी त्यांचा संसार थाटून दिला. आणि इकडे त्यांचे routine बदलले --- शाळा, क्लासेस, tutions आणि सुरश्री.
      आणि साची चा जन्म झाला !! (अतुल-नीता ची मुलगी ) दोन - दोन नाती !! आई एकदम खूष !! नामकरण पण त्यांनीच केला -- सुरश्री - देवश्री (साची ) !!
      अगदी लहानपणापासून , आई दोघींना (सुमा - साची ) घेऊन फिरायला जायच्या . १९९३ मध्ये आईंनी शाळेतून retirement घेतली . आणि त्या -- अतुलदादा ची बदली पुण्यात झाली म्हणून त्यांच्याबरोबर पुण्यात स्थायिक झाल्या, अतुलदादा - नीता दोघेही नौकरी करत."साची ला पाळणाघरात ठेवण्यापेक्षा, मी साम्भाळेन " अस म्हणून त्याच त्यांच्याकडे गेल्या. तिकडे त्यांच जग - आई आणि साची !! घरातली सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळली . सुरश्री पुण्याला गेली कि त्या, सुमा व साची ला घेऊन कुठे बागेत जा तर कधी बँकेत, तर कधी कोणा नातेवाईकाकडे  पण ह्या दोघींना घेऊनच जायच्या !!
      मग आला सुदीप - माझा मुलगा ! त्याच्या जन्माच्या वेळेस आई - २५ डिसेंबर १९९६ ला आई नागपूर ला होत्या. आणि माझे mummy पप्पा होते माझ्याजवळ . पण तरीही मला खूप उदास वाटायचे, कारण माझ्या आई नव्हत्या माझ्याजवळ ! सुदीप झाल्याची बातमी नागपूरला कळली आणि एकच जल्लोष झाला.." मुलगा झाला ..मुलगा झाला !!" माझी एक नुकतीच वयात येणारी पुतणी , जिला हे सर्व कळत होत , तिने हा जल्लोष बघितला आणि म्हणाली , " त्यात काय झालं ? मुलगाच झालाय न ! त्यात येवढा आनंद होण्यासारखे काय ? " सग्गळे एकदम गप्प. मग आमच्या आईंनी तिला जवळ घेऊन तिला तिच्या वयानुसार समजून सांगितले आणि तिला ते पटल देखील ! झालं! आईंची घरी निघायची धावपळ सुरु झाली . कधी एकदा नाशिक ला परत जाते असे झाले. नाशिकला स्टेशनवरून तडक त्या, दवाखान्यात आल्या . आधी माझ्याजवळ येऊन , माझ्या गालावरून हात फिरवून , "कशी आहेस ?" ही विचारपूस करून मग त्या सुदीपकडे वळल्या. सुमाला जवळ घेऊन , " तू ताई झालीस " असे म्हणून दोन्ही नातवंडमध्ये गुरफटून गेल्या. सुमालाही सूनु आज्जी आल्यामुळे खूप आनंद झाला. कारण त्यांचा तिला खूप सहवास लाभला होता. अजूनही तिला तिच्या आज्जीला खूपखूप गोष्टी सांगायच्या होत्या. मग ती आणि तिची आज्जी !. आजही तिच्या मनात काही असेल तर , आधी आज्जी मग बाकीचे असे समीकरण. आणि काही वर्षांनी आला शुभम - १८ नोव्हेंबर २००० ! - अतुलदादा - नीता चा मुलगा . आईंचा परिवार वाढला - अतुल राहुल, नीता अनु, साची सुमा, सुदीप शुभम! हाच त्यांचा परिवार. आजही आमच्याकडे काहीही वस्तू आईंनी घेतली तर , २-२ अशाच घेतात,

( क्रमश:)

No comments:

Post a Comment