Tuesday, 19 July 2016

काळोखात मिणमिणता दिवा ........

तुझी मैत्री आहे म्हणूनच
जगण्याची जिद्द आहे.
तुझ्या मैत्रीतून बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे.

तुझी मैत्री आहे म्हणूनच
आयुष्याचा हा प्रवास आहे.
तुझ्या मैत्रीशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे.

तुझी मैत्री आहे म्हणूनच
तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकते.
वेड्या ह्या जगात
जगण्याची मर्यादा मी पाळू शकते.

तुझी मैत्री आहे .....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळत माझ्यावर
कारण माझ्याकडे तुझ्या मैत्रीचा ठेवा.



1 comment:

  1. मैत्री - खूप सुंदर शब्दांत मनीचे भाव मांडले आहे !
    तुझ्या मैत्रीशिवाय
    जगण्याचा नुसताच भास आहे. - अगदी सत्य १०८%

    ReplyDelete