Wednesday 31 May 2017

......आपत्तिनिवरण काळाची गरज .......

परवाचीच गोष्ट ... 
एक भयंकर अपघात बघितला . तशी मी स्वतः फारच घाबरते ह्या सर्व गोष्टींना .
२ बसेस एकमेकांवर जोरात धडकल्या होत्या इतक्या जोरात कि काही लोक त्यातून बाहेर फेकले गेले होते . एका बस चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला असावा असे बचावलेले म्हणत होते . ती परिस्थिती फारच बिकट होती. बसचे दार जाम झाल्याने लोकांना त्यातून बाहेर पडता येत नव्हत, म्हणून अग्निशामक दल बसचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढत होते. काहींचे हात तर काहींचे पाय तुटले होते. कोणाच्या डोक्यात काचा जाऊन भळाभळा रक्त वाहत होते.

आजूबाजूच्या परिसरातील लोकं धावत पळत आले होते मदतीला , त्याशिवाय मी अजून काही लोकांना अगदी शिताफीने मदत कार्य करताना पहिले. काही तरुण मंडळी, काही वृद्ध , तर काही मुली सुद्धा न घाबरता पुढे येऊन सर्वकाही शांतपणे हाताळत होत्या. त्यांना पाहून मला थोडा धीर झाला आणि जमेल तशी मदत केली.
ते मोजून १०-१५ असतील , पण अगदी सरावल्यासारखे पुढे येऊन हरेकाशी प्रेमाने बोलून शांतपणे हालचाली करत होते. त्यातील काही मुलांनी पटापट पुढे होऊन जखमींच्या अंगावर लाल , हिरवी, पिवळी आणि काळी - अश्या पट्ट्या लावल्या. आणि मग काहींनी आपल्या बॅगेतून वस्तू काढून जखमींना प्रथमोपचार द्यायला सुरुवात केली. काही वृद्ध जमलेल्या गर्दीला एकत्रपणे रोखून धरत होते. त्या गर्दीतून काही तरुण मुलांना हाताशी घेऊन त्यांना आपले काम समजावून सांगून सगळे मदत करत होते. मी थोडं बारकाईने पहिल, तर त्या सर्वांकडे रेस्क्यू किट असा लिहिलेली बॅग होती. त्यातून ते जखमींना औषधोपचार करत होते. कोणाला वेदनाशामक तर कोणाला बँडेज बांधून देत होते. अग्निशामक दल , पोलीस आणि हि मंडळी अगदी सलोख्याने ओरडाआरडा न करता बचावकार्य करत होते.

ते बचावकार्य झाल्यावर त्यातील एकाला news channel च्या काही मंडळींनी घेरले आणि प्रश्नांची सरबराई सुरू झाली. त्या मुलाने शांतपणे त्यांना थांबवले आणि त्यांच्यातीलच Senior मंडळींना बोलावून त्या पत्रकार मंडळींशी भेट घडवून दिली , आणि तो मुलगा तिथून निघून बचावकार्यात सामील झाला.
मला खरोखर आश्चर्य आणि कौतुक वाटलं त्या तरुण मुलाचं ! कारण एरवी आपण पाहतो पत्रकार मंडळी दिसली कि , बहुतेक जण त्यांच्यासमोर येण्याचा प्रयत्न करत असतात आणि मी कसा नि कित्ती बरोबर सांगतोय ह्याचीच चढाओढ असते !

थोड्या वेळाने ambulance आल्या आणि त्या समूहाने सावकाशपणे त्या जखमींना त्यातील stretchers वापरून ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवले आणि काही तर stretcher कमी पडले म्हणून हातातल्या दोऱ्या - बँडेजचे तात्पुरते पण मजबूत stretcher बनवून जखमींना आणून ठेवत होते. ऍम्ब्युलन्स बरोबर त्यातील काही जण दवाखान्यात गेले आणि उरलेल्यांनी बाकीची परिस्थितीचा आढावा घेऊन जाण्याच्या तयारीत होते.

त्यातील एक जण बहुदा नवा होता. त्या दोघातील संभाषण ऐकायाला मिळाले. तर तो yellow cap घातलेला मुलगा त्या नवख्याला सांगत होता कि, हे प्रशिक्षण त्याने अनिरुद्धाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट , मुंबई ह्या संस्थेतून घेतले आहे आणि हि संस्था आपत्तीनिवारण दल तयार करते. त्यांचे संपूर्ण भारतभर कोर्स होतात आणि हा कोर्स पूर्णपणे निःशुल्क आहे - सर्व १८ वयोगटावरील नागिरकांसाठी.

ह्या संस्थेचे उद्दिष्ट सक्षम नागरिक तयार करणे आहे, जे कोणत्याही आपत्तीला न घाबरता निर्भयपणे सामोरे जाऊन , स्वतःचा व इतरांचा जीव वाचवू शकतात. किंबहुना, कुठलीही आपत्ती येण्याअगोदर घेण्याची काळजी, आपत्ती आल्यावर कसे तोंड द्यायचे आणि आपत्ती झाल्यानंतर मदतकार्य कसे करायचे - ह्याचा सखोल अभ्यास ते ह्या कोर्सद्वारे शिकवतात. हा कोर्स विनामूल्य असून २ प्रकारे करता येतो. - एक आठवड्याचा आणि कॉर्पोरेट म्हणजेच २ दिवसांचा सुद्धा आहे.

त्यांचे बोलणे झाल्यावर मी पुढे जाऊन त्या दादाला विचारल, " कुठे असतो हा कोर्स आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायच? मी, एक स्त्री - करू शकते का ? " त्याने हसून , "होय , तुम्हीसुद्धा करू शकता - शिकू शकता. प्रत्येक सामान्य नागरिक शिकू शकतो.  डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम.डी - मेडिसिन आणि संधिवाततज्ञ ) , ह्यांनी दूरदृष्टी ठेऊन अनिरुद्धाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनॅजमेन्टची , मुंबईत स्थापना केली. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या सर्व छोट्या मोठ्या आपत्तींना - नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना - न घाबरता तोंड देता येऊन बचावकार्य करणे सोपे व्हावे ह्यासाठी हे कोर्स सुरु केलेत. ह्यात आपत्तीत अडकलेल्यांचा जीव वाचवणे हाच मुख्य उद्देश आहे - ह्यासाठी आपत्तींत अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांना प्रथमोपचार देणे आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे हाच उद्देश आहे " असे म्हणून मला त्यांच्या वेबसाईट चा पत्ता दिला.


चला तर मग मी तर चालले आहे हे पद्धतशीररित्या शिक्षण घ्यायला. तुमचे काय !!??!!

वेब्साईट आहे - www.aniruddhasadm.com

( क्रमशः )

No comments:

Post a Comment